पार्थ पवार जमीन गैरव्यवहार; तहसीलदारांवर संशयाची सुई!
पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणात नायब तहसीलदार प्रवीण बोर्ले यांच्या तक्रारीनंतर खडक पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाला आहे. या एफआयआरनुसार, ही ४४ एकर जमीन बेकायदेशीरपणे लाटण्याचे प्रयत्न आधीपासूनच सुरू होते. निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेला जागा रिकामी करण्याची पत्रे पाठवली होती, ज्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी पुण्यात खडक पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पुण्याचे नायब तहसीलदार प्रवीण बोर्ले यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, या जमिनीवर आधीपासूनच कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू होता असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. पुणे शहराचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेला (BSI) मुंडव्यातील ४४ एकर जागा रिकामी करण्यासंदर्भात पत्र पाठवले होते, अशी माहिती समोर आली आहे.
बीएसआयचे प्रमुख डॉ. ए. बेनियामिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना हे पत्र मिळाल्यावर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, येवले यांच्या या पत्रावरून त्यांनी बेकायदा पद्धतीने अधिकाराचा वापर केला असा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. सूर्यकांत येवले सध्या निलंबित असले तरी, त्यांच्यावर बोपोडी जमीन घोटाळा प्रकरणी निलंबनाची कारवाई झाली होती. आता मुंडव्याच्या या जमीन प्रकरणातही त्यांचा संबंध समोर येत आहे.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

