Owaisi Rally : …आणि बुरख्यातून आवाज आला, जय भीम.. जय शिवराय… ती म्हणाली, ‘सबको लगेगा की, ये बुरखे वाली…’, VIDEO व्हायरल
अहिल्यानगर येथील असदुद्दीन ओवेसींच्या सभेत एका मुस्लीम महिलेने जय शिवरायचा जयघोष करत उपस्थितांना संबोधित केले. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिने छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मियांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले होते, यावर भर दिला. महाराष्ट्रातील मुस्लिमांना कोणीही हटवू शकत नाही, असे ठामपणे सांगत तिने राजकीय नेत्यांवरही टीका केली.
अहिल्यानगर येथे झालेल्या एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेतील एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका मुस्लीम महिलेने व्यासपीठावरून जय भीम, जय शिवराय असा जयघोष केल्याचे दिसत आहे. आपल्या भाषणात तिने बुरखावाली बाई जय शिवराय कशी म्हणतेय असे वाटणाऱ्यांना उद्देशून सांगितले की, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे.
तिने पुढे नमूद केले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले होते. त्यातून मुस्लिमांना हटवण्याचे जे कारस्थान रचले जात आहे, त्यांना हे सांगू इच्छिते की, आम्ही येथून एक इंचही हटणार नाही, ना विकले जाणार. या प्रसंगी तिने राजकीय नेत्यांवरही अप्रत्यक्षपणे टीका केली. ती म्हणाली, “जे आमच्या मतांच्या भीकेवर निवडून आले आहेत, तेही शांत आहेत आणि ज्यांना आमच्या मतांची भीक नाही मिळाली, त्यांच्याबद्दल तर बोलायचंच नाही.” तिने एका शेरने आपल्या भाषणाचा शेवट केला. हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

