AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Beggar | डोक्यावर बाटली ठेवून योगा, नागपुरातील उलटा चालणाऱ्या भिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

Nagpur Beggar | डोक्यावर बाटली ठेवून योगा, नागपुरातील उलटा चालणाऱ्या भिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 10:45 AM
Share

नागपुरात उलटं चालणाऱ्या एका भिकाऱ्याची सध्या जोरात चर्चा आहे. हा भिकारी डोक्यावर बॉटल ठेऊन उलटा चालतो, फाडफाड इंग्रजी बोलतो आणि भर रस्त्यात एका पायावर उभा राहून योगा करतो. नागपूर शहरात या अनोख्या भिकाऱ्याची सध्या जोरात चर्चा आहे. रस्त्यावर ये जा करणारे लोक क्षणभर थांबतात आणि या उलटा चालणाऱ्या आणि फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या भिकाऱ्याकडे बघतात.

नागपुरात उलटं चालणाऱ्या एका भिकाऱ्याची सध्या जोरात चर्चा आहे. हा भिकारी डोक्यावर बॉटल ठेऊन उलटा चालतो, फाडफाड इंग्रजी बोलतो आणि भर रस्त्यात एका पायावर उभा राहून योगा करतो. नागपूर शहरात या अनोख्या भिकाऱ्याची सध्या जोरात चर्चा आहे. रस्त्यावर ये जा करणारे लोक क्षणभर थांबतात आणि या उलटा चालणाऱ्या आणि फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या भिकाऱ्याकडे बघतात. हा व्हायरल भिकारी सध्या नागपूरकरांच्या कुतुहलाचा विषय ठरतोय. पाहूया एका एनोख्या व्हायरल भिकाऱ्यावर ‘टीव्ही 9 मराठी’चा हा स्पेशल रिपोर्ट.

अंगावर लाल रंगाचं फाटलेलं टी शर्ट… निळ्या रंगाची पॅट… डोक्यावर बॉटल, त्यावर ग्लास… आणि उलटी चाल…. हाच आहे नागपुरात सध्या चर्चेचा विषय ठरलेला व्हायरल भिकारी. राहूल प्रभुदा पेटकर असं नाव सांगणारा हा भिकारी, नागपूरातील रस्त्यांवर उलटा चालतो. जिथं वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवर सरळ चालताना अपघाताची किंवा कुणी येऊन धडकण्याची भिती असते, तिथे हा भिकारी निडर होऊन आणि तेवढ्याच वेगानं उलटा चालतो. जेवढ्या वेगानं हा भिकारी उलटा चालतो, तेवढीच फाडफाड तो इंग्रजीही बोलतो.