Nagpur Updates : 2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची परिस्थिती?
Nagpur Curfew News : नागपूरमध्ये हिंसाचाराच्या घटनेनंतर 11 भागात लावलेल्या संचारबंदी पैकी आज 2 भागातली संचारबंदी काढण्यात आली आहे. तर 3 भागात काहीशी शिथिलता देण्यात आली आहे.
सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर नागपूरमधल्या 11 भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली होती. यापैकी आज 2 भागातील संचारबंदी हटवली आहे. उर्वरित 9 भागांमध्ये मात्र संचारबंदी कायम आहे.
सोमवारी रात्री नागपूरमध्ये 2 गटात तूफान राडा झाला होता. यात मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दगडफेक सुद्धा झाली होती. त्यानंतर खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लावली होती. गेले 2 दिवस ही संचारबंदी कायम होती. त्यानंतर आज पोलिसांनी 2 भागातील संचारबंदी काढली आहे. तर उर्वरित 9 भागात मात्र संचारबंदी जैसे थे ठेवण्यात आलेली आहे. नंदनवन आणि कपिलनगर परीसारतली संचारबंदी हटवली आहे. तर शांतीनगर, पाचपावली, लकडगंज या भागात काहीशी शिथिलता देण्यात आली आहे. हिंसाचार झालेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र कोणतीही सूट दिलेली नाही.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

