Nanded : तो आला त्यानं डाव साधला, वय फक्त 10 वर्ष अन् पळवली सव्वा लाखांची बॅग, CCTV पाहून खळबळ
दहा वर्षाच्या मुलाने सव्वा लाखांची बॅग पळवल्याचा एक सीसीटीव्ही सध्या चांगलाच व्हायरल होतोय. नांदेडमधील जुना मोंढ्यातील ही घटना असून घडलेल्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.
नांदेड शहरातील जुना मोंढा परिसरातून एका दहा वर्षांच्या मुलाने तब्बल सव्वा लाख रुपये किमतीची बॅग पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. व्यापाराच्या अंगावर घाण आहे असं सांगून या दहा वर्षांच्या मुलाने हा डाव साधला आहे. नांदेड शहरात जुना मोंढा भागातील प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुना मोंढा येथील एका व्यावसायिकाची दुकानातून सव्वा लाखांची रोख रक्कम असलेली बॅग चोरीला गेली. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक दहा वर्षांचा लहान मुलगा ही बॅग घेऊन पळताना स्पष्टपणे दिसून आला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्या मुलाचा शोध सुरू केला आहे. जुना मोंढासारख्या वर्दळीच्या आणि व्यावसायिक ठिकाणी अशाप्रकारे अल्पवयीन मुलांकडून चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये तसेच व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

