नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी बांधवाचा होळी उत्सव, 7 दिवस रंगणार होलिकोत्सव

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवाच्या होळी उत्सवाला आजपासुन भोगऱयाने सुरवात झाली आहे. निसर्गपुजकांची हा होळी (Holi) उत्सव जवळपास सात दिवस रंगणार आहे.

मृणाल पाटील

|

Mar 15, 2022 | 11:33 AM

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवाच्या होळी उत्सवाला आजपासुन भोगऱयाने सुरवात झाली आहे. निसर्गपुजकांची हा होळी (Holi) उत्सव जवळपास सात दिवस रंगणार आहे. या भोगऱयामध्ये गावातील मानाच्या लोकांची मिरवणुक काढुन होळी उत्सवाल सुरवात होते. आज सातपुड्या पर्वत रांगामध्ये ठिकठिकाणी भोगऱया बाजारात आदिवासी बांधवांची मोठी गर्दी दिसुन येत आहे. होळी सणासाठी आणि पुजेसाठी लागणारे सारेच साहित्य या भोगऱया मधुन खरेदी केले जाते. सर्वाच्याच आकर्षणाचे केंद्र बिंदु असणारी राजवाडी काठी होळी १७ तारखेच्या रात्री पासुन मनवली जाणार असुन अठराला पहाटेस ही होळी पेटवली जाते.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें