AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narayan Rane | ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडेल : नारायण राणे

Narayan Rane | ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडेल : नारायण राणे

| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 6:33 PM
Share

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना भावी सहकारी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत युतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा दावाही त्यांनी केलाय. त्याबाबत विचारलं असता नारायण राणे यांनी राऊतांवर जोरदार हल्ला चढवलाय.

संजय राऊत यांनी हे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असं वक्तव्य केलं आहे. त्याबाबत विचारलं असता राऊतांनी एकदा तर 25 वर्षे सत्तेत राहू असा दावा केला होता. ते काय घेऊन बोलतात माहिती नाही. पाणी पितात की अजून काही… अशा शब्दात राणे यांनी राऊतांवर खोचक टीका केलीय. तसंच चंद्रकांत पाटील मंत्री बनण्यासाठी शिवसेनाच पाहिजे का? इतर पक्षही आहेत, असं सूचक वक्तव्यही राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केलं. संजय राऊतांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत काय माझा बॉस आहे का? मी त्याच्या प्रश्नाला का उत्तर देऊ, असंही राणे म्हणाले.

Follow Us
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?.

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप