AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naresh Maske : अंबादास दानवेंना विचारतं कोण? त्यांना नेतेपद मिळावं म्हणून शिंदेंनी मेहनत घेतली, नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

| Updated on: Sep 02, 2022 | 2:53 PM
Share

अंबादास दानवेंना विचारतं कोण? त्यांना नेतेपद मिळावे यासाठी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) किती मेहनत घेतली ते विचारा, आत्ता ठाणे आठवले का त्यांना, असा सवाल म्हस्के यांनी केला.

ठाणे :  अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी जास्त फडफड करू नये, नाही तर आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के (Naresh Maske) यांनी दिला आहे. शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटात गेलेल्या आमदारांची गद्दारी जनतेला आवडलेली नाही. त्यामुळे जनता त्यांच्याकडे पाठ फिरवत आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली होती. त्याला मस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अंबादास दानवेंना विचारतं कोण? त्यांना नेतेपद मिळावे यासाठी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) किती मेहनत घेतली ते विचारा, आत्ता ठाणे आठवले का त्यांना? जास्त बोलले तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सामना अग्रलेख तसेच शिवसेनेचा दसरा मेळावा यावरही मत व्यक्त केले.

Published on: Sep 02, 2022 02:53 PM