VIDEO | नाशिक शैक्षणिक संस्था अनुदान लाच प्रकरणातील मुख्य आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर फरार
ठाणे लाचलुचपत विभागाने दोन आरोपीना कोर्टत हजर करत घडला प्रकार सांगितला. न्यायालयाने दोघांना 13 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देऊन मुख आरोपी झनकर यांना फरार घोषित केलं आहे.
नाशिक : दोन शैक्षणिक संस्थांना अनुदान मिळवून देण्यासाठी तब्बल 8 लाख रुपयांची लाच मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लाचलुचपत विभागाने रात्री चौकशी केल्यानंतर यामध्ये दोघांना रात्री अटक करण्यात आली. मात्र यातील मुख्य आरोपी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर या महिला असल्याने त्यांना सूर्यास्तानंतर अटक करता येत नव्हती. त्यांना चौकशीनंतर समन्स देत त्यांच्या नातेवाकांबरोबर घरी जाण्यास परवानगी दिली गेली. तसेच सकाळी कोर्टात हजर व्हा, असंही सांगितलं देलं. मात्र त्याच संधीचा फायदा घेत वैशाली वीर फरार झाल्या. ठाणे लाचलुचपत विभागाने दोन आरोपीना कोर्टत हजर करत घडला प्रकार सांगितला. न्यायालयाने दोघांना 13 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देऊन मुख आरोपी झनकर यांना फरार घोषित केलं आहे.
Latest Videos

