Nashik Journalist Beating : …म्हणून मलाच त्यांनी जास्त मारलं, नेमकं काय घडलं पत्रकारानं सगळंच सांगितलं
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे चार ते पाच पत्रकारांवर झालेल्या अमानुष मारहाणीची घटना समोर समजताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. पण त्यावेळी नेमकं काय घडलं हे त्या पत्रकाराने सगळंच सांगितलं
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या तीन पत्रकारांवर गावगुंडांनी जबर हल्ला केला. या हल्ल्यात पुढारी न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी किरण ताजणे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या किरण ताजणे यांनी मारहाणीच्या घटनेवेळी नेमकं काय घडलं ते सांगितले. किरण ताजणे म्हणाले, त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकनासाठी आलो आहे, असे सांगूनही त्यांना मारहाण केली गेली. सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर लाठ्या आणि दांडक्यांनी बेदम मारहाण करत हल्ला केला. या घटनेमुळे राज्यभर संताप व्यक्त होत आहे आणि पत्रकार संघटनांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करून आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर

