TCS धर्मांतर प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स कमिटी मैदानात?
टीसीएस कंपनीत काम करणाऱ्या अविवाहित तरुणीवरील कथित बलात्कार आणि धर्मांतर प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींच्या समर्थनार्थ ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ पुढे आल्याने प्रकरण अधिक चर्चेत आलं आहे. दरम्यान, फरार आरोपीला आश्रय दिल्याप्रकरणी अडचणीत आलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल आज नाशिक पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टीसीएस कंपनीत काम करणाऱ्या अविवाहित तरुणीवरील बलात्कार आणि धर्मांतर प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींच्या समर्थनार्थ ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ पुढे आल्याने प्रकरण अधिक चर्चेत आलं आहे. दरम्यान, फरार आरोपीला आश्रय दिल्याप्रकरणी अडचणीत आलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल आज नाशिक पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणावर इस्लाम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आरोपींच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्य संशयित निदा खानसह सात आरोपींच्या समर्थनार्थ ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ उभी राहणार असल्याची घोषणा केली.
आसिफ शेख यांनी पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “हे प्रकरण जाणीवपूर्वक पुढे आणण्यात आलं असून ‘खरात प्रकरण’ दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. टीसीएस प्रकरणात कोणतंही तथ्य नाही,” असा दावा त्यांनी केला. तसेच निदा खान यांच्यावर खोटे आरोप करण्यात आल्याचं सांगत, न्यायालयातील सुनावणीवेळी आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिकमध्ये राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Published on: May 25, 2026 01:26 PM
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल

