Nashik Water Cut | नाशिकमध्ये आज पाणीपुरवठा बंद

नाशिकमध्ये आज पाणीपुरवठा बंद. आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार. उद्यापासून पुन्हा नियोजित वेळेनुसार पाणी येणार. गंगापुर धरणातील पाणीसाठी वाढेपर्यंत प्रशासनाचा पाणीकपातीचा निर्णय.

नाशिकमध्ये आज पाणीपुरवठा बंद. आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार. उद्यापासून पुन्हा नियोजित वेळेनुसार पाणी येणार. गंगापुर धरणातील पाणीसाठी वाढेपर्यंत प्रशासनाचा पाणीकपातीचा निर्णय.

जून महिन्यापासून हजेरी लावलेल्या पावसाने यंदा आपला मुक्काम चांगलाच लांबविला. वारंवार दिला जाणारा अतिवृष्टीचा इशारा आणि अविश्रांत कोसळणाऱ्या मुसळधारेने इगतपुरीकर हैराण झाले आहेत. मात्र असे असले तरी गतवर्षीपेक्षा पावसाचा आलेख उंचावला असला तरी नियोजनाच्या अभावामुळे पुन्हा भर पावसाळ्यात महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या इगतपुरी शहरात पाणीचिंता सुरू झाली आहे. पाणीकपात करण्यासाठी तत्परता दाखविणारे प्रशासन पाण्याच्या नियोजनाबाबत मात्र तत्पर नसल्याची खंतही यावेळी नागरिकांकडून व्यक्त केली जाात आहे. भावली धरण सततच्या पावसामुळं भरण्याच्या मार्गावर असून पाणीकपात कधी रद्द होणार याकडे इगतपुरीकरांचं लक्ष लागंल आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI