नवी मुंबईत एपीएमसी मर्चंट चेंबर मधील दुकानाला आग

नवी मुंबईतील एपीएमसी मधील मर्चंट चेंबर या इमारतीमधील एका लाईटच्या दुकानाला आग लागली आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला अनेक अडथळे येत आहे.

नवी मुंबईतील एपीएमसी मधील मर्चंट चेंबर या इमारतीमधील एका लाईटच्या दुकानाला आग लागली आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला अनेक अडथळे येत आहे. तिथल्या गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्याचा साठा असल्याने आग अधिक भडकून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. मर्चंट चेंबर इमारतीमधील एका गाळ्याला आग लागल्याने संपूर्ण परिसरात भीती पसरली आहे. मर्चंट चेंबर या इमारतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुकाने आहेत. त्याठिकाणी विकला जाणारा माल साठवण्यासाठी पार्किगच्या जागेचा वापर होत आहे. बुधवारी त्याठिकाणी एका दुकानात आग लागली असता त्याठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त असलेल्या साठ्याने पेट घेतला. यामुळे आग अधिक भडकून धुराचे लोट निघत आहे. यामुळे संपूर्ण इमारतीमधील नागरिकांनी बाहेर धाव घेतली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI