Special Report | कोर्टनं फटकारलं, राणांमागे ‘सदावर्ते’ पॅटर्न?-tv9

हनुमान चालिसा म्हणून फडणवीसांनी नवनीत राणांवरच्या कारवाईचा निषेध केला.एकाबाजूला भाजप नेते नवनीत राणांना पाठिंबा देतायत. आणि दुसरीकडे नवनीत राणांनी पोलिसांवर केलेल्या आरोपांमुळे नव्या चर्चा होतायत.पोलिसांनी मला वॉशरुमला जाऊ दिलं नाही, मी मागासवर्गीय असल्यामुळे पाणी दिलं नाही. असे गंभीर आरोप नवनीत राणांनी लोकसभाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात केले आहेत.

दादासाहेब कारंडे

|

Apr 25, 2022 | 9:35 PM

हनुमान चालिसा म्हणून फडणवीसांनी नवनीत राणांवरच्या कारवाईचा निषेध केला.एकाबाजूला भाजप नेते नवनीत राणांना पाठिंबा देतायत. आणि दुसरीकडे नवनीत राणांनी पोलिसांवर केलेल्या आरोपांमुळे नव्या चर्चा होतायत.पोलिसांनी मला वॉशरुमला जाऊ दिलं नाही, मी मागासवर्गीय असल्यामुळे पाणी दिलं नाही. असे गंभीर आरोप नवनीत राणांनी लोकसभाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात केले आहेत. 23 तारखेला मला खार पोलीस स्टेशनमध्ये नेलं गेलं. पूर्ण रात्र मी तिथंच होते. त्यादरम्यान मला तहान लागली. मी पोलिसांकडे पिण्यासाठी पाणी मागितलं. त्यावर एक पोलीस म्हटला की, तुम्ही मागासवर्गीय असल्यामुळे इतरजण वापरत असलेल्या ग्लासमधून तुम्हाला पाणी देता येणार नाही. हे ड्युटीवरच्या पोलिसांनी मला सांगितलं. हा प्रकार माझ्यासाठी धक्कादायक होता. मला बाथरुमही वापरु दिला गेला नाही. जातीवरुन हिणवलं गेलं. पण दुसऱ्या बाजूला राणा दामप्त्यांमागच्या अडचणी थांबताना दिसत नाहीयत.

राजद्रोहाचा गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळत हायकोर्टानं राणा दाम्पत्यानं फटकारलंय. जबाबदार पदावर असणाऱ्यांनी विशेषकरून लोकप्रतिनिधींनी एकमेकांविषयी आदरानं बोलावं आणि वागावं असं आम्ही वारंवार म्हणतो. मात्र लोकप्रतिनिधी त्याकडे कानाडोळा करतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींकडून याप्रकरणी काही अपेक्षा करणं चुकीचं आहे, अश्या शब्दात हायकोर्टानं राणा दाम्पत्याला फटकारलंय. पण आता नवीन एखादा खटला दाखल करायचा असेल, तर राणा दाम्पत्याला त्याआधी 72 तासांची नोटीस दिली जावी, असंही कोर्टानं स्पष्ट केलं. राणा दाम्पत्यावर 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. ज्यात दोन समुदायात तेढ निर्माण केल्याचा आरोप ठेवला गेलाय.

दुसरं कलम 353. म्हणजे सरकारी कामात अडथळा. जेव्हा पोलीस अटकेसाठी गेले, तेव्हा राणांनी त्या कारवाईला विरोध केला होता. आणि 24 अ म्हणजे राजद्रोह. मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द, सरकारच्या नोटिशीला न जुमाननं असे एकूण 3 गुन्हे दाखल आहेत, यापैकी राजद्रोहाचा गुन्हा रद्द करावा यासाठी राणा दाम्पत्यानं याचिका केली होती. कारण, समजा जर 353 म्हणजे सरकारी कामात अडथळ्याच्या गुन्हयात राणांना जामीन मिळाला, तरी पोलिसांना 24 अ म्हणजे राजद्रोहाच्या गुन्ह्यात राणांना पुन्हा अटकेचे अधिकार आहेत. त्यामुळे घटना एकच असताना दोन एफआयआर का, असा सवाल राणांनी उपस्थित केला होता. त्यावर घटना एकच असली, तरी गुन्हे वेगवेगळ्या वेळेला घडल्यामुळे ३ कलमं लावल्याचा दावा सरकारी वकिलांनी केलाय.

ज्याप्रमाणे सदावर्तेंमागे वेगवेगळ्या गुन्ह्यांचा ससेमिरा लागला., त्याचप्रमाणे राणा दाम्पत्यांमागेही गुन्ह्यांचं ग्रहण लागण्याची शक्यता आहे. सदावर्तेंवर पहिला गुन्हा पवारांच्या घरावर हल्ल्यास चिथावणी दिल्याबद्दल झाला. नंतर त्यांची वादग्रस्त विधानं, अपशब्द, समाजात तेढ निर्माण करणारी विधानं, आर्थिक फसवणूक असे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले. दुसरीकडे राणा दामप्त्यांवर खार पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झालाय. उस्मानाबादेतही मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द दाखल केल्याचा गुन्हा नोंदवला गेलाय. आणि त्यानंतर पुण्यातही दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा गुन्हा राणा दाप्त्यत्याविरोधात दाखल झालाय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें