AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी दौऱ्यावर गेले- नवनीत राणा

मी माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी दौऱ्यावर गेले- नवनीत राणा

| Edited By: | Updated on: May 20, 2022 | 4:30 PM
Share

खासदार नवनीत राणा दिल्लीत आल्यावर या दौऱ्याबाबत आणि राऊतांच्या भेटीबाबत नवनीत राणा यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी खासदार नवनीत राणा यांनी ही विचारांची लढाई आहे. ती विचारांनी लढत राहणार असे सावध उत्तर दिले.

ल्या दोन दिवसांपासून राज्यात काही खास फोटोंची चर्चा होती. हे फोटो साधेसुधे नव्हते तर हे फोटो अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Naveet Rana), आमदार रवी राणा आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या लडाखमधील (Ladakh Tour) भेटीचे होते. या दौऱ्यात संजय राऊत (Sanjay Raut) आणि रवी राणा एकत्र नाष्टा करताना, एकत्र गप्पा मारताना, फिरताना दिसून आले. राज्यात काही दिवसांपूर्वी एकमेंकांवर तुटून पडणारे नेते असे भेटल्याने चर्चेला उधाण आले होते. खासदार नवनीत राणा दिल्लीत आल्यावर या दौऱ्याबाबत आणि राऊतांच्या भेटीबाबत नवनीत राणा यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी खासदार नवनीत राणा यांनी ही विचारांची लढाई आहे. ती विचारांनी लढत राहणार असे सावध उत्तर दिले.