Aryan Khan Breaking | ड्रग्स केस प्रकरणात आर्यन खानला पुन्हा NCBकडून समन्स

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेता आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आता NCB कडून पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं आहे. आर्यनसह तीन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता. आर्यनलाही अनेक अटी मान्य कराव्या लागल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे तो देशाबाहेर जाऊ शकत नाही. त्यांना देशाबाहेर जायचे असेल, तर त्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार होती.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Nov 07, 2021 | 6:48 PM

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेता आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आता NCB कडून पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं आहे. आर्यनसह तीन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता. आर्यनलाही अनेक अटी मान्य कराव्या लागल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे तो देशाबाहेर जाऊ शकत नाही. त्यांना देशाबाहेर जायचे असेल, तर त्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार होती.

बॉलीवूड अभिनेत्री जुही चावलाने 28 ऑक्टोबर रोजी न्यायालयात पोहोचून आर्यनसाठी जामीनपत्र भरले. ती सत्र न्यायालयात आर्यनसाठी कोर्टरुममध्ये उभी राहिली आणि त्याचा जामीनदार बनण्याविषयी बोलली. यादरम्यान अभिनेत्रीच्या वतीने तिचे वकील सतीश मानशिंदे यांनी कोर्टात सांगितले की, पासपोर्टवर तिचे नाव नोंदवले आहे. त्यांचे आधार कार्डही लिंक करण्यात आले आहे. ती आर्यन खानबाबत आश्वासन देत आहे. ती आर्यनच्या वडिलांची जुनी मैत्रीण आहे आणि आर्यनला त्याच्या जन्मापासून ओळखते. अशा परिस्थितीत न्यायमूर्तींनी अभिनेत्री जुहीच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली आणि आर्यनला जामीनपत्र जारी केले होते.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें