AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP Ajit Pawar Group Candidate List : अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर, 'या' 38 उमेदवारांना संधी

NCP Ajit Pawar Group Candidate List : अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर, ‘या’ 38 उमेदवारांना संधी

| Updated on: Oct 23, 2024 | 2:10 PM
Share

NCP Ajit Pawar Group First Candidate List for Maharashtra Eelctions 2024: विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या यादीत कोणाला मिळाली संधी बघा?

अवघ्या एका महिन्यावर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून २३ नोव्हेंबर रोजीच या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय पक्षांकडून आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी अधिकृतरित्या जाहीर करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच रविवारी भाजपने आपल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. तर मंगळवारी काल शिंदेंच्या शिवसेनेकडून ४५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आल्याचे पाहायला मिळाले तर यापाठोपाठ आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर कऱण्यात आली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत ३८ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये बारामतीतून स्वतः अजित पवार विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत तर याचबरोबर मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, हसन मुश्रीफ, दिलीप मोहिते पाटील यांना देखील पक्षाकडून तिकीट जाहीर करण्यात आले आहेत.

Published on: Oct 23, 2024 01:06 PM