अजित पवार हे अस्वस्थ; भाजप प्रवेशावर ‘या’ नेत्याचे वक्तव्य
याचदरम्यान उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. लवकरच बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच केल्याने अजित पवार यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरून शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्याने अजित पवार हे अस्वस्थ असल्याचे म्हटलं आहे
नाशिक : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या जवळकीची चर्चा रंगली असतानाच अंजली दमानिया यांच्या एका ट्विटने राजकीय खळबळ उडवून दिली. त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार लवकरच भाजपमध्ये जाणार, असा दावा केला. त्यानंतर अजित पवार यांच्यावरून राजकीय खडबत सुरू झाली. याचदरम्यान उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. लवकरच बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच केल्याने अजित पवार यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरून शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्याने अजित पवार हे अस्वस्थ असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उत आला आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रीया दिली. त्यांनी याबाबत आपल्याला काही माहित नाही. पण जर वरिष्ठ पातळीवर काही विषय असतील तर काही माहित नसल्याचे म्हटलं आहे. याचबरोबर गेल्या एका वर्षापासून अजित पवार हे अस्वस्थ आहेत असेही त्यांनी म्हटलं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

