Dhananjay Munde राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग, महायुती सरकारमध्ये कोण घेणार धनंजय मुंडेंची जागा?
धंनजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता मुंडेंच्या जागी छगन भुजबळ यांची महायुती सरकारमध्ये एन्ट्री होणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हालचालींना मोठा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान धंनजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता मुंडेंच्या जागी छगन भुजबळ यांची महायुती सरकारमध्ये एन्ट्री होणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यामध्ये यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीत आता धनंजय मुंडे यांची जागा कोण घेणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतरच अवघ्या अडीच महिन्यात धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याची माहिती सीआयडीच्या आरोपपत्रातून समोर आली. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचेही समोर आले होते. त्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. त्यानंतर अखेर मुंडेंनी आपला राजीनामा दिला आहे. अशातच मुंडेंच्या जागी आता मंत्रिमंडळात छगन भुजबळांची वर्णी लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
