मुंबई: “आमची खेळी नव्हती. राजांचा सन्मान करण्यासाठी सर्वानुमते निघणारा मार्ग होता. त्याच्यामुळे खेळीचा प्रश्न येतो कुठे? खेळी केली शरद पवारांनी. पाठिंबा दिला. दुसऱ्या दिवशी संजय राऊतांना बोलायला लावलं. शिवसेना शिवबंधन बांधायला सांगते, मग यात खेळ्या कुणाच्या? देवेंद्र फडणवीसांना खेळी करण्याची आवश्यकता नव्हती. आम्ही राजांचा सहावर्ष सन्मान केला” असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.