भर पत्रकार परिषदेत अजितदादांनी टाकला बाऊन्सर अन् शिंदेंनी मारला सिक्सर, बघा नेमकं झालं काय?
राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या या तिनही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये एकनाथ शिंदे यांची फिरकी घेतल्याचे पाहायला मिळाले.
महायुतीची एक संयुक्त पत्रकार परिषद काल चांगलीच चर्चेत राहिली. त्याचं कारण म्हणजे अजित पवारांचा बाऊन्सर आणि त्यावर एकनाथ शिंदेंचा सिक्सर… यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. माध्यमांच्या प्रतिनिधींचा प्रश्नाचा चेंडू हा थेट एकनाथ शिंदे यांच्यासाठी होता. पण अजित पवार यांनी एक्ट्रा बाऊन्स देऊन तो एकनाथ शिंदे यांच्याकडे टाकला. एकनाथ शिंदे कदाचित प्लेड करतील अशी आशा अजित दादांना असावी. पण एकनाथ शिंदेंनी त्या बाऊन्सरवर बॉऊन्ड्री पार करत थेट सिक्सर मारला. आपला बाऊन्सर एकनाथ शिंदेंसाठी सरपटी बॉल ठरल्याचे लक्षात आल्यावर दादांनी सावरलं खरं पण एकनाथ शिंदे यांनी टोलावलेला चेंडू पोहोचायचा तिथे पोहचला. संयुक्त पत्रकार परिषदेत शिंदे आणि अजितदादांमध्ये रंगलेल्या बॅटिंगवेळी समर्थक आमदारांच्या चेहऱ्यावरील हावभाव रंजकपणे बदलत होते. अजित पवारांच्या उत्तरानंतर मोठी टाळी वाजवत प्रवीण दरेकर यांनी प्रसाद लाड यांच्या पाठीवर थाप मारली. बाकी सर्वही खळखळून हसले. तर धनंजय मुंडे आणि रावसाहेब दानवे यांच्या उशीरा लक्षात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसूही उशिराच उमटलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट