राऊतांचं मोती बिंदूचं ऑपरेशन आम्हालाच करावं लागेल, पाहा कुणी केली टीका
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अजितदादा पवार यांच्यावर टीका केली होती. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याच्या ओघात संजय राऊत यांनी अजित पवार यांचे नाव न घेता कोणी काकांचा पक्ष चोरतं, कोणी बापाचा पक्ष चोरतं अशी झोंबरी टीका केली होती. त्यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा गटाचे मंत्री अमोल मिटकर यांनी जोरदार पलटवार केला आहे.
मुंबई | 14 जानेवारी 2024 : काही लोकांनी काकांचा पक्ष चोरला अशी झोंबरी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत यांची तीन इंद्रीयं काम करीत नाहीत त्यामुळे संजय राऊत अशी बेताल वक्तव्य करीत असतात असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्या शरीरात जी इंद्रिय आहेत त्यातील दोन इंद्रिय निकामी झालेली दिसतायत एक म्हणजे जीभ आणि दुसरे म्हणजे डोळे आणि तिसरा अवयव मला सांगायचा आहे तो म्हणजे मेंदू..ज्यावेळी ही तीन इंद्रिय काम करीत नाहीत तेव्हा हे बेताल वक्तव्य येतं. राष्ट्रवादी कॉंग्रेस कुणाचा आहे. कुणाच्या मालकीचा आहे हे एकदा बघावं नाही तर तुमच्या डोळ्याच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन आम्हाला करावं लागेल असे अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

