आपल्याला आरक्षण आहे म्हणून आपण पास होतोय – जितेंद्र आव्हाड
ओबीसींची नक्की लोकसंख्या किती हा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे जनगणना होणे गरजेचे असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी आरएसएसचे भैय्याजी जोशी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणावरून भाजपावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने ओबीसींची (OBC) जनगणना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना करावी, जे काय असेल ते समोर येईल. मात्र सध्या जे सत्तेत आहेत त्यांच्याकडून ओबीसींचं कल्याण होईल असे वाटत नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. ओबीसी आरक्षणाबाबत केंद्रांची दुटप्पी भूमिका दिसून येत आहे. कोर्टात एक सांगायचं लोकसभेत एक सांगायचं असे केंद्राचे धोरण असल्याची टीका देखील जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
Published on: May 25, 2022 06:28 PM
Latest Videos
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

