Eknath Khadse | BHR प्रकरणात आवाज उठवल्याने माझ्या मागे EDची चौकशी : एकनाथ खडसे

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर ईडीने कारवाई केल्याच्या चर्चेला उधाण आले होते. दरम्यान आज एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे एका कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

जळगाव: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. ज्यांचे वडील मास्तर होते. त्यांनी हजार बाराशे कोटींची संपत्ती जमवली. त्यांची चौकशी का होत नाही?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे खडसे आणि महाजन यांच्यात पुन्हा जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर ईडीने कारवाई केल्याच्या चर्चेला उधाण आले होते. दरम्यान आज एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे एका कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना खडसे यांनी आता ईडीचा काहीही संबंध राहिला नसल्याचे म्हटले आहे. याबाबत न्यायालयात खटला दाखल केला असल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच यावेळी आपल्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या विरोधकांना खडसे यांनी धारेवर धरले असून गिरीश महाजन यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी सोसायटीचा घोटाळा मी उघड केला. विरोधकांचे खरे दुखणे हे असून त्यामुळे विरोधक माझ्यावर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI