AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'मी पाया फक्त तीनच जणांच्या पडतो...', हसन मुश्रीफ यांच्या 'त्या' गौप्यस्फोटावर जितेंद्र आव्हाड आक्रमक

‘मी पाया फक्त तीनच जणांच्या पडतो…’, हसन मुश्रीफ यांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर जितेंद्र आव्हाड आक्रमक

| Updated on: Aug 28, 2023 | 5:49 PM
Share

VIDEO | हसन मुश्रीफ यांच्या गौप्यस्फोटावर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया अन् काय दिला इशारा; म्हणाले, 'कशाला खोटारडपणा करता आयुष्यभर खोटारडापणा केलात माझ्यावर जर अजून टीका कराल तर...'

ठाणे, २८ ऑगस्ट २०२३ | सध्या राष्ट्रवादीमध्ये जितेंद्र आव्हाड – हसन मुश्रीफ यांच्यात सामना सुरू झालाय. कोल्हापूरमधून जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापुरी पायतानानं ठेचून काढा असं म्हटलं तर हसन मुश्रीफ यांनी कपाशी चप्पलेनं आवाज काढणार असं म्हणत पलटवार केला होता. मात्र अद्याप त्यांच्यातील वाद काही केल्या थांबताना दिसत नाही. मुश्रीफ साहेब तुम्ही माझ्यावर टीका केली, तुम्ही जे बोलला ना जितेंद्र आव्हाडांनी पाय पकडले, हा सांगणारा कोण मूर्ख कोण? पण हे नक्कीच जयंत पाटील नसतील. तुम्ही उगाच जयंत पाटलांचं नाव घेतलं. जयंत पाटलांचे नाव घेत असाल तर जयंत पाटलांनी तुम्हाला एका प्रकरणात मदत केली. त्या प्रकरणात मदत करणारा कोणाचा माणूस होता हे एकदा जयंत पाटलांना विचारा आणि ती मदत किती मोठी होती याची कल्पना करा. आपले नेते बसले होते, एकत्र यायला पाहिजे अशी चर्चा झाली. मी म्हटलं मी नाही येऊ शकत तर ते म्हणाले चल ना. मी विचारधारा सोडणार नाही तसं असेल तर मला MLC करा’, असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. ते असेही म्हटले की, तिथे कुठला गुन्हा, पाया पडणं हे घडलं होतं का हे कुराणवर हात ठेवून सांगा? कशाला खोटारडपणा करता आयुष्यभर खोटारडापणा करत आलात. पेशंटच्या नावावर करोडो रुपये कमावले.मी फार कमी लोकांवर बोलतो, जास्त कोणावर टीका करत नाही, माझ्यावर टीका कराल तर अजून विषारी टिका करेन, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफ यांना थेट इशाराच दिला.

Published on: Aug 28, 2023 05:49 PM