Rupali Chakankar Video : ‘…तेही माझ्यावर फिदा’, रोहिणी खडसेंनी मेकअपवरून केलेल्या टीकेवर रूपाली चाकणकरांचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टिकास्त्र डागलंय..रोहिणी खडसे यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर मेकअपवरून निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहिणी खडसे यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर मेकअपवरून टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे यांना खुश करण्यासाठी रोहिणी खडसे यांनी हे विधान केलं असल्याचे रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, रोहिणी खडसे यांनी केलेल्या टीकेवरून रूपाली चाकणकर यांनी त्यांना टोला लगावत विरोधातील महिलाही माझ्यावर फिदा असल्याचे वक्तव्य केले आहे. ‘चांगलं मेकअप करून आणि पक्षाच्या सर्व कार्यक्रमाला हजर राहून तिथे मटकायचं एवढंच रूपाली चाकणकर यांचं काम दिसतंय. त्यांच्या पुण्यात घडलेल्या घटनांवर त्यांनी काहीच भाष्य केले नाही. त्या संपूर्ण महिला आयोगाच्या अध्यक्षा नाही तर त्या फक्त सत्ताधारी पक्षांच्या बाजूने बोलणाऱ्या महिला आयोग आहे.’, असं वक्तव्य रोहिणी खडसे यांनी करून चाकणकरांवर सडकून टीका केली. तर रोहिणी खडसे यांनी केलेल्या टीकेवर रूपाली चाकणकरांकडून देखील पलटवार करण्यात आला आहे. ‘गेल्या दोन वर्षांत केवळ साड्या आणि टिकलीवर आंदोलन करणारे पुढील पाच वर्षही त्यावरच आंदोलन करणार आहेत. कारण तेवढी वैचारिकता त्यांच्यात नाही. आपण कोणता विषय मांडावा… विरोधातील महिला देखील माझ्यावर फिदा आहेत’, असं चाकणकरांनी म्हणत टोला लगावला आहे.

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?

एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
