‘मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी छोटे नेते…’, पवारांवर टीका करणाऱ्या खोतांसह फडणवीसांवर रोहित पवारांचा निशाणा
जतमध्ये झालेल्या सभेत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या आजारपणावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर सदाभाऊ खोत यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांनी हल्लाबोल केला. दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी दिलगिरीही व्यक्त केली. अशातच रोहित पवार यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधलाय.
सदाभाऊ खोत यांनी गोपिचंद पडळकर यांच्यासाठी जतमध्ये झालेल्या सभेत शरद पवार यांच्या आजारपणावरुन वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. खोत म्हणाले, “आता महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?”, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर रोहित पवार यांनी भाष्य करताना भाजपवर सडकून टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले, २०१४ पासून एक व्यक्तीच कारणीभूत आहे. ती व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस.. हे काय करतात त्यांच्या आसपास छोटे नेते संभाळून ठेवतात आणि त्यांना राजकीयदृष्ट्या का पळलेलं असतं तर मोठ्या नेत्यांवर भूंकण्यासाठी… राजकीय दृष्टीकोनातून मोठ्या नेत्यांवर भूंकायचं आणि त्यांना बिस्कीट म्हणून एखादं पदं दिलं जातं, असं म्हणत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. पुढे रोहित पवार असेही म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्याला राजकीय वर्तुळातील नेत्यांवर बोलता येत नाही. पण असे छोटे-छोटे नेते सांभाळून ठेवलेत. त्यांना सांगायचं या बड्या नेत्यावर भूंकायला लाग…
Published on: Nov 08, 2024 04:17 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
