हीच महाराष्ट्राची संस्कृती का? सुप्रिया सुळे यांचा शिक्षणमंत्र्यांच्या वर्तवणुकीवर सवाल
शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला आहे. तर दीपक केसरकर यांनी 'त्या' महिलेची माफी मागावी, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजप महिला विरोधी आहेच मात्र मित्रपक्षही तसे वागायला लागले आहेत, असं म्हणत सुप्रिया सुळे यांची खोचक टीका
पुणे, २८ नोव्हेंबर २०२३ : राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी महिलेचा अपमान करावा हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे का? असा सवाल करत शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला आहे. तर दीपक केसरकर यांनी ‘त्या’ महिलेची माफी मागावी, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजप महिला विरोधी आहेच मात्र मित्रपक्षही तसे वागायला लागले आहेत, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी खोचक टीका केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी एका महिला शिक्षिकेने दीपक केसरकर यांना रखडलेल्या शिक्षक भरतीवरून थेट जाबच विचारल्याचे पाहायला मिळाले. यानंतर केसरकर त्या महिलेवरच भडकले. इतकेच नाहीतर जर बेशिस्त असाल तर तुम्ही सरकारी नोकरीत येऊ शकत नाही. तुम्ही कशा मुलांना शिकवणार आहात? असा सवालही केसरकर यांनी विचारला होता. यावरूनच सुप्रिया सुळे यांनी दीपक केसरकर यांना घेरलं आहे.
Published on: Nov 28, 2023 04:35 PM
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
