शरद पवार यांना आणखी एक धक्का, नागालँडच्या ‘या’ आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा!
शरद पवार यांना राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या आणखी सात आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे.
मुंबई, 21 जुलै 2023| अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. अशातच शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या आणखी सात आमदारांना अजित पवारांनी फोडलं आहे. नागालँडमधील राष्ट्रवादीच्या सात आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. इतकंच नाहीतर नागालँडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीदेखी अजित पवारांसोबत असल्याचं सांगितलं आहे. आमदारांसोबत पदाधिकाऱ्यांनीसुद्धा अजित पवारांना पाठिंबा दिल्याने शरद पवारांना राष्ट्रीय पातळीवर धक्का असल्याचं बोललं जात आहे. हे सात आमदार कोण आहेत, यासाठी हा व्हिडीओ पाहा…

