शरद पवार यांनी सहकारी बँकांबाबत नरेंद्र मोदींना निवेदन दिलं : नवाब मलिक

सहकारी बँकांचे अधिकार कमी होऊन आरबीआयला ज्यादा अधिकार देण्यात‌ आले त्याबाबत‌ शरद  पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

शरद पवार यांना कालही राजनाथ सिंग भेटले होते. काल एक बैठक झाली त्यात ए के अँटोनी, लष्करप्रमुखही बैठकीला होते. सहकारी बँकांचे अधिकार कमी होऊन आरबीआयला ज्यादा अधिकार देण्यात‌ आले त्याबाबत‌ शरद  पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शरद पवार यांची कुठलीही भेट झालेली नाही, असंही ते म्हणाले. पंतप्रधान भेटीबाबत‌ काँग्रस, मुख्यमंत्र्यांना कल्पना होती. करोना काळात ज्या अडचणी येतात त्याबाबत‌ चर्चा केली. लसीबाबत‌ योग्य पुरवठ्याबाबत‌ चर्चा झाली. शरद पवार यांच्या भेटीबद्दल नवाब मलिक यांनी ही माहिती दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI