शरद पवार आणि नितीन गडकरी यांची नागपुरात दीड महिन्यात दुसरी भेट, काय झाली चर्चा?
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दीड महिन्यात दुसऱ्यांना नागपूरच्या दौऱ्यावर असताना घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
नागपूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. नागपूरात नितीन गडकरींच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट झाली. गेल्या दीड महिन्यात नागपूरात शरद पवार आणि नितीन गडकरी यांची ही दुसरी भेट झाली आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये ऊसशेती, साखर कारखानदारी आणि शेतकरी या विषयावर चर्चा झाल्याची माहिती आहे, पण या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा राजकीय अर्थही काढला जातोय. राजकारणातले दोन दिग्गज नेते भेटल्यावर राजकीय चर्चा तर होणारंच. दोन्ही नेत्यांमध्ये आज जवळपास ४० मिनीट चर्चा झालीय. यापूर्वी १२ फेब्रुवारीला शरद पवार नागपूर आणि वर्ध्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळेसंही परत जाताना विमानतळावर शरद पवार आणि नितीन गडकरी यांची भेट झाली. दरम्यान, शरद पवार यांचे राजकारण अवघ्या देशाला माहीत आहेत. ते राजकारणात सर्व पर्याय खुले ठेवत असल्याचं जाणकार सांगतात. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने न मागता भाजपला पाठिंबा दिला होता. २०१९ लाही फडणवीस सोडून इतर कुणीही चालेल असा प्रस्ताव दिल्याची चर्चा होती. त्यामुळे आज शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्या भेटीत शेती विषयावर चर्चा झाली असली, तरिही या भेटीला राजकीय महत्त्वही मोठं आहे.
Published on: Apr 01, 2023 07:29 PM
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
