Sharad Pawar | केंद्र सरकारकडून विरोधकांची मुस्कटदाबी : शरद पवार

ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. जनता यांना धडा शिकवेल, असं शरद पवार म्हणाले.

सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात चांगलीच टोलेबाजी केली. “अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. जनता यांना धडा शिकवेल”, असं शरद पवार म्हणाले. पाहुणे घरात आहेत, ते आपलं काम करत आहेत. ते पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन, जे सत्य आहे ते उघड होईल, अशी शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आयकर खात्याच्या (Income Tax) धाडीवर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावर शरद पवारांनीही भाष्य केलं. शरद पवार म्हणाले, “अजित पवारांकडे सरकारी पाहुणे (आयकर छापा) आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. जनता यांना धडा शिकवेल, असं शरद पवार म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI