AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal | राज्यसभेवर भुजबळांची नजर?; राज्यसभा तिकीटासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली

Chhagan Bhujbal | राज्यसभेवर भुजबळांची नजर?; राज्यसभा तिकीटासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली

| Updated on: May 29, 2026 | 1:29 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसमधील राज्यसभेच्या रिक्त जागेवरून राजकीय हालचालींना वेग आला असून मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यसभेच्या या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भुजबळ यांनी अधिकृतपणे आपली इच्छा व्यक्त केली नसली, तरी पडद्यामागून त्यांनी हालचाली सुरू केल्याचा दावा केला जात आहे. तसेच राज्यसभेच्या उमेदवारीसोबतच पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावं, यासाठीही भुजबळ आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत इच्छुक असलेल्या छगन भुजबळ यांना पक्षाकडून आता केंद्रात संधी दिली जाणार का, याबाबतही राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेच्या उमेदवारीवरून पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे.

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते मानले जात असल्यामुळे त्यांना डावलणं पक्षासाठी सोपं नसल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. त्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यसभेसाठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Published on: May 29, 2026 01:29 PM
Follow Us