कानातल्या कुजबूजीवर शहाजीबापू पाटील म्हणाले, माझा रस्ता भगव्या झेंड्याबरोबर
त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार शहाजीबापू पाटीलही मंचावर होते. यावेळी त्यांची शरद पवार यांच्याबरोबर काही कुजबूज सुरू होती. त्यावरून राजकीय चर्चांना उधान आलं आहे.
सांगोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर प्रथमच सोलापूर दौऱ्यावर आहेत. ते सांगोल्यात बाबूरावजी गायकवाड यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त माझी वाटचाल या आत्मचरित्र आणि गौरव ग्रंथाच्या प्रकाशन व सत्कार समारंभाला उपस्थिती होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार शहाजीबापू पाटीलही मंचावर होते. यावेळी त्यांची शरद पवार यांच्याबरोबर काही कुजबूज सुरू होती. त्यावरून राजकीय चर्चांना उधान आलं आहे. यावरूनच त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, शरद पवार आणि माझा मार्ग हा वेगवेगळा असल्याचे सांगितलं. तर पवार यांनी काय कानमंत्र दिला ही वेगळी बाब असली तरिही आमचे मार्ग वेगळे आहेत. माझा रस्ता भगव्या झेंड्याबरोबर आहे. त्यांच्या रस्ता तिरंगी झेंड्या बरोबर.
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
