जास्त मुदत दिल्याबद्दल Narayan Rane यांचे आभारी आहोत, Jayant Patil यांचा टोला

आतापर्यंत भाजपच्या नेत्यांनी पाच – सहा वेळा वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत. लोकांना आशेवर ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे हे मी समजू शकतो, असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला आहे.

मुंबई : महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) फार काळ टिकणार नाही, असा दावा करतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आघाडी सरकार पडण्याची तारीखही जाहीर केलीय. राणे यांच्या या भविष्यवाणीनंतर महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या नेत्यांकडून नारायण राणे आणि भाजपवर जोरदार पलटवार सुरु झालेत. ‘गेली दोन वर्ष विरोधक आघाडी सरकार जाण्याच्या वेगवेगळ्या तारखा देत आहेत. मात्र, नारायण राणे यांनी मार्च ही जास्तच मुदत दिली त्याबद्दल नारायण राणे यांचे आभार, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राणेवर खोचक टीका केलीय. आतापर्यंत भाजपच्या नेत्यांनी पाच – सहा वेळा वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत. लोकांना आशेवर ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे हे मी समजू शकतो, असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला आहे. त्यांचा पक्ष टिकवायचा असेल तर अशी आश्वासने व असं वातावरण कायम ठेवावं लागतं, असंही पाटील म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI