Super Fast News : राजधानितच परिक्षार्थी विद्यार्थ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष; अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर बैलगाडा शर्यतीचा थरार

राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत 5.8 टक्के वाढ झाली आहे. जी एका वर्षात 24 लाख आहे.

Super Fast News : राजधानितच परिक्षार्थी विद्यार्थ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष; अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर बैलगाडा शर्यतीचा थरार
Image Credit source: tv9
| Updated on: Mar 09, 2023 | 9:35 AM

मुंबई : सध्या राज्यात 10 आणि 12 च्या परिक्षा सुरू आहेत. यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागात वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत. मात्र राज्याच्या राजधानितच परिक्षार्थी विद्यार्थ्यांना विनाकारण 150 ते 175 रूपयांचा चा फटका बसत आहे. परिक्षाकेंद्रावर बस किंवा रिक्षा मिळत नसल्याने हा फटका बसत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न सोडविण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. तर राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत 5.8 टक्के वाढ झाली आहे. जी एका वर्षात 24 लाख आहे. विशेष बाब म्हणजे इलेक्ट्रानिक वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. तर अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर बैलगाडा शर्यतीचा थरार झाला. यासह राज्यातील सुपरफास्ट 50 न्यूज पहा…