Pahalgam Attack : भारतात बंदी असलेल्या ‘या’ फोनचा दहशतवाद्यांकडून वापर? NIA च्या तपासातून मोठी माहिती उघड
जंगलाच्या रस्त्याने तब्बल २२ तास पायी चालत अतिरेकी पहलगामच्या बैसरन पर्यटकांवर हल्ला करण्यासाठी पोहोचले. यावेळी AK-47 आणि M4 असॉल्ट रायफलचा वापर करत अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला.
पहलगाम येथील बैसरन व्हॅली मध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर तपास सुरू करण्यात आला असून या तपासांतर्गत एक-एक माहिती समोर येत आहेत. अशातच पहलगाम येथील हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांनी चिनी बनावटीचा सॅटेलाईट फोन वापरला होता, अशी मोठी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दहशतवाद्यांनी चिनी बनावटीचा सॅटेलाईट फोन वापरल्याची माहिती एनआयएच्या तपासातून उघड झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. दहशतवाद्यांनी वापरलेला चिनी बनावटीचा सॅटेलाईट फोन हा Huawei या कंपनीचा होता. हा सॅटेलाईट फोन ट्रॅक झाल्याची सूत्रांकडून मिळत आहे. तर भारतात Huawei कंपनीच्या चिनी बनावटीचा सॅटेलाईट फोन वापरण्यास बंदी आहे. दरम्यान, पाकिस्तान मधूनच या फोनची भारतात तस्करी झाल्याचा एनआयएला संशय असल्याचे सांगितले जात आहे.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!

