विनायक राऊत यांच्या ‘त्या’ टीकेवर नितेश यांचं आवाहन; म्हणाले, “तुमची 10 कामं…”
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. नारायण राणे यांनी स्वत:चे हात डागाळलेले असताना उद्धव ठाकरेंवर आरोप करण्याची नौटंकी करू नये, स्वत:च्या बुडाखाली काय जळते ते राणे यांनी पाहावे, असं विनायक राऊत म्हणाले.
सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. नारायण राणे यांनी स्वत:चे हात डागाळलेले असताना उद्धव ठाकरेंवर आरोप करण्याची नौटंकी करू नये, स्वत:च्या बुडाखाली काय जळते ते राणे यांनी पाहावे, असं विनायक राऊत म्हणाले. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी विनायक राऊत यांना आवाहन केलं आहे. “विनायक राऊत यांना मी आवाहन करतो, त्यांनी राणे कुटुंबियावरील टीका सोडून त्यांची 10 कामं दाखवावीत. 10 वर्षात फक्त राणेंवर टीका केली. त्यांनी विकास काम केलेली सांगावीत,” असं नितेश राणे म्हणाले.
Published on: Jun 28, 2023 05:51 PM
Latest Videos
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?

