“संजय राऊत हे राष्ट्रवादीची व्हायझेड टीम”, नितेश राणे यांची टीका
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केसीआर राव यांच्या पंढरपूर दौऱ्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला होता. चंद्रशेखर बावनकुळे भाजपची सी टीम असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सिंधुदुर्ग: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केसीआर राव यांच्या पंढरपूर दौऱ्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला होता. चंद्रशेखर बावनकुळे भाजपची सी टीम असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, “पत्राचाळ घोटाळ्याचा प्रमुख आरोपी कैदी नंबर 8969 संजय राऊत यांच्या बाबत आज सुनावणी आहे. लोकांचा पैसा खाणारा, मराठी माणसांना बेघर करणारा, भ्रष्टाचारी, 420 संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन भाजपला ज्ञान पाजळत होता. उद्या दाऊद विजय मालिया पत्रकार परिषद घेतील. लोकांचे पैसे खाऊन हा श्री 420 आमच्या बावनकुळे साहेबांवर टीका करतो. आमचे बावनकुळे साहेब केसीआरची सी टीम आहे, असं संजय राऊत म्हणाले. तर मग मी म्हणतो संजय राजाराम राऊत राष्ट्रवादीची व्हायझेड टीम आहे,” असं नितेश राणे म्हणाले.
कोकाटेंविरोधात इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं लिलावतीत दाखल, झालं काय?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?

