Nitesh Rane : इथं हिरव्या सापांची वळवळ… तिसरा डोळा उघडायला लावू नका… ‘I Love मोहम्मद’वरून राणेंचा इशारा
महाराष्ट्रामध्ये हिरव्या सापांची वळवळ झाल्याचे आणि आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर्स लावल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. राज्यात हिंदुत्ववादी सरकार असून, वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झाल्यास कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. अहमदनगर व औरंगाबादच्या नामकरणाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
भाजप नेते नितेश राणे यांनी नुकत्याच एका निवेदनात महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, “हिरव्या सापांची वळवळ झाली आहे, पण इथे हिंदुत्ववादी सरकार आहे.” आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर्स सर्वत्र लावण्यात आले असून, यामुळे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला. असे प्रयत्न झाल्यास सरकारला विचार करावा लागेल आणि तिसरा डोळा उघडायला लावू नका, असा इशाराही त्यांनी दिला. राणे यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.
अहमदनगरचे अहिल्यानगर आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण महाराष्ट्र सरकारने केले असताना ते स्वीकारण्यास विरोधक नकार देत असल्याचे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि कायदा व सुव्यवस्था मान्य आहे, त्यांनी हे नामकरण स्वीकारले पाहिजे. राज्यात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार असल्याने कोणीही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

