Nitin Gadkari | साखर कारखाना काढण्यावर बंदी आणली पाहिजे, गडकरींचे साखरसम्राट धक्क्यावर धक्के

मागच्या वर्षी आपण निर्मिती केली 310 लाख टन साखरेची. म्हणजे आपण 70 लाख टन साखर अधिक तयार केली. त्यामुळे मी म्हणतो महाराष्ट्राने आणि देशाने आता नवीन साखर कारखाने काढण्यास बंदी आणली पाहिजे. नाही तर परिस्थिीती खराब होईल.

नगर: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील साखर कारखान्यांना धक्क्यावर धक्के दिले आहेत. राज्यात साखर कारखाने काढण्यावर बंदी आणली पाहिजे, असं मोठं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे. तसेच हे विधान करण्यामागची कारणमिमांसाही त्यांनी केली आहे. नितीन गडकरी यांनी नगरमध्ये विकास कामांचं भूमिपूजन केलं. नव्या घोषणाही केल्या. तसेच साखर सम्राटांना धक्क्यावर धक्केही दिले. आपल्या देशात 240 लाख टन साखरेची गरज आहे. मागच्या वर्षी आपण निर्मिती केली 310 लाख टन साखरेची. म्हणजे आपण 70 लाख टन साखर अधिक तयार केली. त्यामुळे मी म्हणतो महाराष्ट्राने आणि देशाने आता नवीन साखर कारखाने काढण्यास बंदी आणली पाहिजे. नाही तर परिस्थिीती खराब होईल. साखर कोणी घेतच नाही. हे अर्थचक्र जर उलटं फिरलं तर शेतकऱ्यांना परवडणार नाही, बँकाही डुबतील आणि कारखानेही बंद पडतील, अशी धोक्याची सूचनाही गडकरींनी दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI