UPSC RESULT | राज्यात नितिशा जगतापची 21व्या वर्षीच UPSC परीक्षेत यशाला गवसणी

यूपीएससी नागरी सेवा 2020 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातून 100 पेक्षा अधिक परीक्षार्थींनी यश संपादन केलं आहे. मुळची लातूरची असलेली नितीशा जगताप हिचं या परीक्षेतलं यश पाहता तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अवघ्या 21 व्या वर्षी तिने देशातली सगळ्यात अवघड समजली जाणारी UPSC परीक्षा तिने क्रॅक केलीय.

यूपीएससी नागरी सेवा 2020 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातून 100 पेक्षा अधिक परीक्षार्थींनी यश संपादन केलं आहे. मुळची लातूरची असलेली नितीशा जगताप हिचं या परीक्षेतलं यश पाहता तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अवघ्या 21 व्या वर्षी तिने देशातली सगळ्यात अवघड समजली जाणारी UPSC परीक्षा तिने क्रॅक केलीय. नितीशाच्या घरची परिस्थिती फार काही बरी नाही. वडील एलआयसी एजंट तर आई गृहिणी. पण नितीशाच्या मनात लहानपणापासून शिक्षणाची जिद्द होती. मोठं होऊन अधिकारी बनण्याचं तिचं स्वप्न होतं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI