भोंग्यावर बंदी नाहीच, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची सर्वपक्षीय बैठकीनंतर घोषणा
राज्यातील कोणत्याही धार्मिक स्थळांवरचे भोंगे (Loudseakers) हटणार नाहीत. स्थानिक पातळीवर प्रत्येक स्थळांनी आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी घेतला आहे.
राज्यातील कोणत्याही धार्मिक स्थळांवरचे भोंगे (Loudseakers) हटणार नाहीत. स्थानिक पातळीवर प्रत्येक स्थळांनी आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी घेतला आहे. राज्यातील मशिदींवरचे भोंगे येत्या 03 मेपर्यंत हटवण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thacleray) राज्य सरकारतर्फे यांनी दिल्यानंतर राज्याचं गृहमंत्रालय यासंदर्भात काय निर्णय घेतंय, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आज यासंदर्भात राज्य सरकारतर्फे सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात राज्य सरकारने पूर्वी जारी केलेल्या जीआर सर्क्युलरनुसारच सर्व अटी व नियमांचे पालन केले जावे, असे गृहमंत्र्यांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'

