AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Local Body Elections : दिवाळीनंतर महापालिका निवडणुकांचा बार पण यावेळी मतं दिसणार नाही! कारण काय?

Local Body Elections : दिवाळीनंतर महापालिका निवडणुकांचा बार पण यावेळी मतं दिसणार नाही! कारण काय?

| Updated on: Aug 06, 2025 | 12:50 PM
Share

महापालिकांच्या निवडणुका कधी होणार याच उत्तर राज्य निवडणूक आयोगाने दिलंय दिवाळी झाल्यावरच निवडणुकीचा बारा उडेल तर या निवडणुकीत मतदान केल्यावर मत दाखवणारी व्हीव्हीपॅट मशीन नसेल व्हीव्हीपॅट वापरणार नसल्याचे आयोगाने सांगितले त्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय

मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबरनंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल असं म्हटलंय. 21 ऑक्टोबरला दिवाळी आहे, त्यामुळे दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबरमध्ये निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. त्यातही विशेष बाब म्हणजे महापालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएमला व्हीव्हीपॅट नसेल. म्हणजे मतदान कोणाला केलं हे दाखवणारी मशीन लावण्यात येणार नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमला व्हीव्हीपॅटच मशीन जोडलं होतं. पण आता नगरसेवकांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन नसेल अशा निवडणुकांमध्ये राज्य निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट वापरत नाही, असं राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे.

आता व्हीव्हीपॅट म्हणजे काय?

आपण कोणाला मतदान केलं ते व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून दिसत. उदाहरणार्थ भाजपला मतदान केलं तर कमळ चिन्हासह संबंधित उमेदवाराची चिठ्ठी व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून दिसते आणि मतदारानं काँग्रेसला मतदान केलं तर पंजा चिन्हाची चिठ्ठी व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून दिसते पण आता महापालिकांसह नगरपालिकांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापरणं शक्य नसल्याच आयोगाने म्हटलंय.

Published on: Aug 06, 2025 12:50 PM