Amol Mitkari : अजून भुंकला तर..; मिटकरींनी शेअर केली हाकेंची ‘ती’ ऑडिओ क्लिप
Amol Mitkari vs Laxman Hake : आमदार अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांची एक ऑडिओ क्लिप ट्विट करून हाके यांना थेट इशारा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना उभं करून हाकेंनी तोडपाणी केली. लोहा मतदारसंघानंतर आता हाके यांच्याकडून भोकर विधानसभेत तोडपाणी करण्यात आली, असं राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हंटलं आहे. याबद्दलची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. अमोल मिटकरी यांनी ही ऑडिओ क्लिप ट्विट करून पुन्हा एकदा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला चढवला आहे.
उमेदवारांकडून पैसे घेऊन ओबीसी उमेदवारांना माघार घ्यायला लावली. हाके यांचा काळा पैसा गाडीच्या माध्यमातून बाहेर निघतो आहे, असंही अमोल मिटकरी यांनी म्हंटलं आहे. इतकंच नाही, तर अजून भुंकला तर दुसरी ऑडिओ क्लिप आपलोड करण्याचा थेट इशारा देखील मिटकरी यांनी हाकेंना दिलेला आहे. दरम्यान, या ऑडिओ क्लिपची पुष्टी टीव्ही9 मराठी करत नाही.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

