AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | 3 महिन्यात डेटा मिळवून, आरक्षण पुन्हा मिळेल ?

Special Report | 3 महिन्यात डेटा मिळवून, आरक्षण पुन्हा मिळेल ?

| Edited By: | Updated on: Dec 15, 2021 | 8:52 PM
Share

ओबीसी आरक्षणाशिवाय ठरलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याचा आदेश निवडणूक आयोगाला कोर्टानं दिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी आता पुढे येत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीतही असा एक प्रस्ताव तयार करण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलीय.

मुंबई : ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) सर्वोच्च न्यायाल्याने (Supreme Court) दिलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) मोठा झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला (Election Commission) स्पष्ट निर्देश दिलेत की, 27 टक्के ओबीसी आरक्षण जागा ह्या खुल्या प्रवर्गासाठी म्हणून नोटीफाय करा आणि ह्या 27 टक्के आणि आधीच्या 73 टक्के जागांवरचा निकालही एकाच दिवशी लावला जावा. म्हणजेच ओबीसी आरक्षणाशिवाय ठरलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याचा आदेश निवडणूक आयोगाला कोर्टानं दिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी आता पुढे येत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीतही असा एक प्रस्ताव तयार करण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलीय.

Published on: Dec 15, 2021 08:52 PM