AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal : तो काळतोंड्या बोलतो कसा येतो तेच बघतो! अरे काय तू बघणार... थेट बीडमधून भुजबळांचा जरांगेंना इशारा

Chhagan Bhujbal : तो काळतोंड्या बोलतो कसा येतो तेच बघतो! अरे काय तू बघणार… थेट बीडमधून भुजबळांचा जरांगेंना इशारा

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Oct 17, 2025 | 9:20 PM
Share

बीड ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावर, जातगणनेवर आणि विरोधकांवर जोरदार प्रहार केला. त्यांनी त्वरित जातगणनेची मागणी केली, तर २ सप्टेंबरच्या जीआरविरोधात न्यायालयात आणि रस्त्यावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

बीड येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका मांडली. त्यांनी काही मराठा आंदोलकांवर दारूवाले आणि वाळूचोर असल्याचा आरोप करत सरकारवर त्यांना नरमाईने वागल्याची टीका केली. यावेळी भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देत थेट सभेतून इशारा दिला. यासह भुजबळ यांनी दशवार्षिक जनगणनेसोबत जातगणना करण्याची मागणी पुन्हा एकदा केली. यासाठी पंतप्रधान मोदींनी पूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. यावेळी त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि समीर भुजबळ यांनी संसदेत जातगणनेची मागणी कशी लावून धरली होती, याची आठवण करून दिली. तसेच, २ सप्टेंबर रोजीच्या जीआरविरोधात समता परिषद आणि इतर ओबीसी संघटना न्यायालयात गेल्या असून, न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Published on: Oct 17, 2025 09:17 PM
Follow Us