के.पी. गोसावीच्या अडचणीत आणखी वाढ, फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल
क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच किरण गोसावी याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनमध्ये किरण गोसावीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे: क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच किरण गोसावी याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनमध्ये किरण गोसावीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. वानवडी पोलीस स्टेशनमध्येही आज दिवसभरात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी ‘टीव्ही 9’ ला दिली. तसेच शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी चिन्मय देशमुख गोसावीच्या विरोधात फरासखाना पोलीस स्टेशनला वेगळी तक्रार देणार आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात पुढे काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
Latest Videos
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया

