ओमराजे, सचिन अहिर थेट लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला; इतर खासदार… दिल्लीत खरंच काही तरी घडतंय?
ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या चर्चेने काही काळापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाची या घडामोडीत चर्चा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा या नेत्यांशी संबंधित राजकीय हालचालींना वेग आला आहे.

काही महिन्यांपूर्वी सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला धक्का देत शिंदे गटातून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाली होती. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा सचिन अहिर आणि इतर नेते चर्चेत आले आहेत. ओम बिर्ला यांच्यासोबत झालेल्या भेटीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर तसेच इतर काही नेते उस्थित होते.
संबंधित नेते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी थेट दिल्लीला पोहोचले आहेत. या भेटीबाबत सचिन अहिर यांनी माहिती दिली आहे. आता या भेटीचे फोटोही समोर आले आहेत. त्यामुळे या भेटीमागे नेमकी कोणती राजकीय चर्चा झाली, याबाबत उत्सुकता वाढली आहे. मात्र सचिन अहिर यांनी सांगितले की ही सदिच्छा भेट होती. या भेटीचे छायाचित्र समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना आणखी उधाण आले
Published on: Aug 04, 2026 03:30 PM
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,