आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त ठाणेकरांची शक्ती स्थळावर गर्दी
ठाणे जिल्हाप्रमुख आणि शिवसेना नेते स्वर्गीय आनंद दिघे यांची आज ७१ वी जयंती आहे. यानिमित्त ठाणे महानगरपालिकेने विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे.
ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( uddhav thackrey ) यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( cm eknath shinde ) यांच्या ठाणे ( thane ) या बालेकिल्ल्यात जाऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक जमा झाले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात आपल्या गटाचे शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
ठाणे जिल्हाप्रमुख आणि शिवसेना नेते स्वर्गीय आनंद दिघे यांची आज ७१ वी जयंती आहे. यानिमित्त ठाणे महानगरपालिकेने विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, शिंदे गटाचे आमदार आनंद दिघे यांचे समाधी स्थळ ‘शक्तीस्थळ’ येथे उपस्थित रहाणार आहेत. ‘शक्ती स्थळ’ येथे फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून ठाणेकर यांची शक्ती स्थळावर गर्दी होताना दिसत आहे.

